
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ – रोटरी क्लब ऑफ हिल सिटी या संस्थेच्या अध्यक्षपदी नाशिक जिल्ह्यातील अव्वल कामगिरी करणारे व्यक्तिमत्व गोरख बोडके यांची निवड करण्यात आली आहे. आपल्या विविधांगी कामाद्वारे इगतपुरी तालुक्यातील विविध गावांत विकासाभिमुख कामांनी त्यांनी ठसा उमटवला आहे. म्हणूनच त्यांना विकासपुरुष असे म्हटले जाते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करतांना त्यांनी यापूर्वी अभूतपूर्व काम केले आहे. कोरोना काळात टॉप टेन कामात ते अग्रेसर आहेत. जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. इगतपुरी तालुक्यातील बहुतांश गावात गोरख बोडके यांनी आपले आगळेवेगळे काम निर्मित केल्याचे दिसून येते. रोटरी क्लब ऑफ हिल सिटी या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने प्रत्येक गावात निश्चितच विकासाची समाजाभिमुख कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पदग्रहण समारंभ झाल्यानंतर विकासासाठी निरंतर तत्पर राहणार असल्याचे ते म्हणाले. इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, शहापूर, अकोले आणि नाशिक जिल्ह्यात त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले