
इगतपुरीनामा न्यूज, दि. 28 ( निलेश काळे, पिंपळगाव मोर )
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील धामणी गावात ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त गर्दीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण संपन्न झाले. आरोग्य वर्धिनी केंद्र धामणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव नियोजनातून लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. उदघाटन सरपंच बन्सी गोडे, उपसरपंच गौतम भोसले यांच्या हस्ते झाले.
वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, शिक्षक यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शेगावकर, डॉ. संदीप वेढे, डॉ. प्रतिभा खोब्रागडे, डॉ. अश्विनी सानप, डॉ. मोरे, आरोग्य पर्यवेक्षक श्री. आखाडे व श्री. सूर्यवंशी नाना यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी लस घेतली.
आरोग्य सेवक भरत जाधव, मुरली ठाकूर, राजू जारवाळ, महेश वालझाडे, अनिल मुंदे, शरद घाणे, यादव, सविता थोरात, एम. एम. कुलकर्णी, ज्योती टोचे, चंद्रकला गोडे, कापसाबाई पगारे, अनिता लोहकरे, मुख्याध्यापिका सुवर्णा खोडके, मोनाली सुर्यवंशी, प्रदीप खैरनार, पोलीस पाटील सदाशिव भोसले, वसंत भोसले, रमेश भोसले, कांतीलाल भोसले, सोपान भोसले, शरद भोसले, अरुण लहामगे, बंडू भोसले, जगन भोसले, शिवनाथ लाड आदींनी लसीकरण यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.