
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ – इगतपुरी येथील प्रभू नयन फाउंडेशन आणि श्री साई सहाय्य समिती यांच्या वतीने अपंगांना सायकलीचे वाटप करण्यात आले. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या उपस्थितीत वाटप कार्यक्रम झाला. इगतपुरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी अपंग व गरजू व्यक्तीसाठी तहसीलदार परमेश्वर कासुळे व प्रभु नयन फाऊंडेशनचे आनंद मवाणी यांच्याकडे मागणी सायकली मागितल्या होत्या. ही मागणी पूर्ण झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमावेळी तहसीलदार परमेश्वर कासुळे, प्रभू नयन फाऊंडेशनचे आनंद मवाणी, दीपा मवाणी, श्री साई सहाय्य समितीचे अध्यक्ष राजु देवळेकर, सुनील मते, नितीन गव्हाणे, पत्रकार शैलेश पुरोहित, सपन परदेशी, अशोक ताथेड, मंगेश शिंदे आदी उपस्थित होते.