इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – इगतपुरी तालुक्यातील व्यापार नगरी घोटी ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी श्रीकांत रमेश काळे यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांना सूचक म्हणून रामदास भोर होते. मंजुळा नागरे यांच्या अर्जाला सूचक म्हणून भास्कर जाखेरे होते. १७ सदस्य असलेल्या घोटी ग्रामपालिकेच्या उपसरपंचच्या निवडीप्रसंगी १६ सदस्य उपस्थित होते. हात वर करून १५ सदस्यांनी श्रीकांत काळे यांना कौल दिला. मावळत्या उपसरपंच रुपाली रुपवते यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवड घेण्यात आली. अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच गणेश गोडे यांनी काम पाहिले.
यावेळी रामदास भोर, संजय आरोटे, संजय जाधव, सचिन गोणके, भास्कर जाखेरे, स्वाती कडू, अरुणा जाधव, वैशाली गोसावी, सुनीता घोटकर,अर्चना घाणे, रुपाली रुपवते, कोंड्याबाई बोटे, सुनंदा घोटकर आदी सदस्य उपस्थित होते. शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, संतोष दगडे, रामदास शेलार, रमेश काळे, बाळासाहेब वालझाडे, सुनील जाधव, सुरेश काळे, हिरामण वालझाडे, अशोक काळे, देविदास काळे, हिरामण कडू, शरद हांडे, ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे आदींनी श्रीकांत काळे यांना शुभेच्छा दिल्या. उपसरपंच पदासाठी श्रीकांत काळे यांना कोणाचा पाठींबा आहे त्यांनी हात उंच करून संमती द्यावी असे सदस्यांना सांगितले. यावेळी उभे असलेल्या सदस्याने देखील हात उंच करून संमती दिल्याची चर्चा सगळीकडे रंगली होती.