नेट,सेट, पीएचडी धारक यांच्या सत्याग्रह आंदोलनास शिक्षक भारतीचा जाहीर पाठिंबा : प्रा. महेश पाडेकर

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

पुणे येथे शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र यांच्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या महाराष्ट्रातील नेट-सेट, पीएचडी धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांचे बेमुदत सत्याग्रह आंदोलनास कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भारती संघटना अहमदनगर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. पाठिंब्याचे पत्र राज्य समन्वयक नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समिती यांच्याकडे देण्यात आले. तसेच माहितीची प्रत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व सहशिक्षण संचालक पुणे यांना ई-मेलच्या माध्यमातून देण्यात आल्याचे शिक्षक भारती संघटना अहमदनगरचे सरचिटणीस महेश पाडेकर यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षापासून वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक भरती बंद असल्याने शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत नाही. नेट-सेट, पीएचडी धारक प्राध्यापक अल्प मानधनावर वेठबिगारीचे काम करत आहे. फुले ,शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयात उच्चविद्याविभूषित शिक्षक, प्राध्यापक या बुद्धीजीवी लोकांची पिळवणूक चालू आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे असे मत सरचिटणीस महेश पाडेकर यांनी मांडले.

समान काम समान वेतन या धोरणाप्रमाणे सेवाशर्ती नुसार नियमित वेतन द्यावे व यूजीसीच्या आदेशाप्रमाणे शंभर टक्के प्राध्यापक भरती होण्यासाठी लोकशाही मार्गाने बेमुदत सत्याग्रह आंदोलन नेट-सेट, पीएचडी धारक संघर्ष समितीने सुरू केले आहे. शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, कार्याध्यक्ष डॉ. किशोर डोंगरे, सचिन जासूद, रुपाली, कुरूमकर, कैलास राहणे, कोषाध्यक्ष सुनील साबळे, श्याम जगताप, दिनेश शेळके, प्रवीण मते, संजय तमनर, रोहिदास चव्हाण, राजेंद्र जाधव, बाबासाहेब लोंढे, सुदाम दिघे, हनुमंत रायकर, संभाजी पवार, कैलास जाधव, नवनाथ घोरपडे, किसन सोनवणे, सिकंदर संजय पवार, सुदर्शन ढगेशेख, अशोक अन्हाट, संभाजी चौधरी, मोहंमद समी शेख, श्रीकांत गाडगे, सुर्यकांत बांदल, जॉन सोनवणे, बाळासाहेब शिंदे, रेवन घंगाळे, प्रशांत कुलकर्णी, एम. पी. शिर्के, हनुमंत बोरुडे, सोमनाथ बोंतले, प्रकाश मिंड, मधुकर नागवडे, महादेव कोठारे, संतोष देशमुख, योगेश कराळे, काशीनाथ मते आदींसह सर्व जिल्हा, तालुका पदाधिकारी शिक्षक भारती संघटना अहमदनगर आदींनी पाठिंबा जाहीर केला.