मराठी भाषेचे संवर्धन होणे ही काळाची गरज -माजी न्या. वसंत पाटील

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

मराठी भाषेचे महत्व जाणून घेवून तिचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे असणार आहे असे प्रतिपादन सेवा निवृत्त न्यायमूर्ती वसंत पाटील यांनी वाडीवऱ्हे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ आणि इगतपुरी तालुका साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादाप्रसंगी बोलतांना केले. वाडीवऱ्हे येथील श्री स्वामी सद्गुरु सार्वजनिक वाचनालय येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मराठी भाषेचे महत्व आणि संवर्धन या विषयांवर परिसंवाद आणि कविसंमेलन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर जेष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, वाडीवऱ्हेचे सरपंच रोहिदास कातोरे, उपसरपंच प्रवीण मालुंजकर, जेष्ठ कवी माणिकराव गोडसे, गोविंद डगळे, दिलीप मालुंजकर आदी उपस्थित होते. यावेळी पुंजाजी मालुंजकर, रवींद्र देवरे यांनी परिसंवादात सहभाग घेतला. माणिकराव गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन पार पडले. यात पुंजाजी मालुंजकर, ज्ञानेश्वर गुळवे, शिवाजी क्षीरसागर, रूपचंद डगळे, शरद मालुंजकर, सुदर्शन पाटील, रवींद्र देवरे यांनी आपल्या रचना सादर केल्या. कार्यक्रमासाठी बाणेश्वर मालुंजकर, सचिन सोनवणे, श्रीयश मालुंजकर, राहुल मुसळे, शरद भोर, आदित्य भोर, सौरभ टिळे, आदित्य पाटील, करण कातोरे, अथर्व गवते, ईश्वर गवते, योगेश गवते, आणि माध्यमिक विद्यालय वाडीवऱ्हेचे सहकार्य लाभले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!