इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – इगतपुरी, घोटी, शहापूर आणि समृद्धी महामार्ग प्रकल्प यांना भावली धरणाचे पाणी देऊन मानवेढे आणि परिसरातील गावांना मात्र तहानलेले ठेवले जात आहे. यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी थेट भावली धरणावर जाऊन सर्व योजनांचा पाणीपुरवठा बंद पाडला आहे. जोपर्यंत मानवेढे आणि परिसरातील गावांना पाणी दिले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. ह्यामध्ये पुरुषांनी सुद्धा मोठ्या संख्येने भाग घेतला आहे. आंदोलनाचे नेतृत्व ग्रामपंचायत पदाधिकारी करीत असून यामुळे प्रशासनाला मात्र घाम फुटला आहे.
धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती असून इगातपुरी तालुक्यातील भावली धरणावर मानवेढे गाव आणि परिसरातील आक्रमक महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलननाला सुरुवात केली आहे. जलजीवन योजने अंतर्गत मानवेढे येथे पाणीपुरवठा योजनेचे काम तांत्रिक कारणामुळे बंद असल्यमुळे मानवेढे आणि जांभचीवाडीसह परिसरातील अनेक वाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लगतच असणाऱ्या समृद्धीच्या कामासह इगतपुरी आणि घोटीच्या पाणी पुरवठा पाणी दिल जात आहे. मात्र गावकरी पाण्यावाचून तहानलेले आहे. त्यामुळे संतापलेल्या महिला ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलनास करून समृद्धी आणि इगतपुरीचा पाणीपुरवठा बंद केला आहे पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवणार नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन करणार असल्याचं इशारा आंदोलकांनी दिला आहे.