केंद्रप्रमुख मारहाण प्रकरण – आमच्या सर्व ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करा ; दरेवाडी ग्रामस्थांची पोलिसांकडे मागणी : विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ निघाले इगतपुरी पोलीस ठाण्याकडे

इगतपुरीनामा न्यूज, दि. 14

इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील केंद्रप्रमुखाला मारहाण प्रकरणी तेथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दरेवाडी येथील सर्व ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सर्व विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ इगतपुरी पोलीस ठाण्यात लवकरच पोहोचून सर्वांना अटक करावे अशी लेखी मागणी करणार आहेत असे खात्रीदायक समजते. केंद्रप्रमुख माधव उगले यांनी मारहाण केल्याचा खोटा आरोप करून आपली चुक झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आमच्या मुलाबाळांसह आम्ही सर्वांनीच मारहाण केली असे समजून आमच्या सर्वच वाडीकर ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करा. आम्ही अटक होण्यास तयार आहोत अशी मागणी थोड्याच वेळात पोलिसांकडे केली जाणार आहे. आमच्या गावाची शाळा बंद करून आम्हाला शेळ्या वळायला लावता का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!