
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ – मध्य रेल्वेच्या मार्गावरील घोटी रेल्वे स्टेशन जवळ हॉलिडे मेल गाडीचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरला अडकला आहे. त्यामुळे डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली असल्याचे वृत्त आहे. डाऊन मार्गावरून धावणाऱ्या गाड्या एक तासापासून खोळंबल्या आहेत. मध्य रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून इंजिन बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. थोड्याच वेळात वाहतूक सुरळीत होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
