ओमानंदनगर येथील अतिक्रमण आणि पाणीपुरवठ्याचा अडथळा होणार दूर : ग्रामपालिकेच्या आश्वासनानंतर घोटीवाडी ग्रामस्थांचे आत्मदहन आंदोलन मागे

इगतपुरीनामा न्यूज, दि. 21

घोटी बुद्रुक ग्रामपालिका हद्धीतील ओमानंदनगर येथील सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण व सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे अतिक्रमण दुर करण्यात येणार आहे. घोटी ग्रामपालिकेने याप्रकरणी घोटीवाडीचे आंदोलक मल्हारी कचरू दालभगत आणि अतिक्रमणकर्ते गोविंद कचरू भोर व शंकर कचरू भोर यांच्याशी बैठकीत चर्चा करण्यात आली. ग्रामस्थ आणि आंदोलक यांच्यातर्फे परस्पर सहमती करून वादग्रस्त प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी मंजुरी दिली. मात्र याबाबत शक्य तेवढ्या लवकर कार्यवाही न झाल्यास पुन्हा आत्मदहन आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा मल्हारी दालभगत यांनी दिला. यामुळे उद्या मंगळवारी दि. 22 ला होणारे आंदोलन स्थगित केल्याचे घोषित करण्यात आले. बैठकीवेळी ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदळे, माजी सरपंच रामदास भोर, संजय जाधव, सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष नारायण जाधव, सखाराम दुर्गुडे, कैलास त्रिभुवन, ग्रामपालिका सदस्य श्याम घोटकर, मल्हारी दालभगत, शंकर भोर, दत्ता भोर, ज्ञानेश्वर भोर, किशोर जाधव, नंदू भोर, भगवान भोर, मच्छिंद्र भोर, सोपान भोर, जालिंदर दालभगत, नवनाथ दालभगत, पांडुरंग भोर, नवनाथ रामदास भोर आणि घोटीवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!