बेलगाव कुऱ्हे गावाजवळ मोटारसायकल अपघातात लहवित येथील युवक गंभीर जखमी : जगद्गुरू नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेने वाचवले प्राण

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

बेलगाव कुऱ्हे गावाजवळ बरशा म्हटल्या जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर मोटारसायकलच्या वेगाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. ह्या अपघातात नाशिक तालुक्यातील लहवित येथील २५ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. वाडीवऱ्हेकडून बेलगाव कुऱ्हे मार्गाने लहवितकडे जातांना हा अपघात झाला. आज रात्री सव्वाआठला झालेल्या अपघाताची माहिती समजताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमी युवकाला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. एमएच १५ बीक्यू ८४५२ ह्या मोटारसायकलवरून प्रकाश बापू काळे मोबाइल 25 रा. लहवित ता. नाशिक हा युवक लहवितकडे चालला होता. भरधाव वेगात असलेल्या मोटारसायकलचा वेग नियंत्रणात न आल्याने हा अपघात झाला. हा युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!