बेवारस अवस्थेत सापडलेले प्रेत इगतपुरी तालुक्यातील देवळे येथील व्यक्तीचे : पीएसआय अरुण आव्हाड यांनी रघुनाथ तोकडे यांच्या मदतीने केली उकल

इगतपुरीनामा न्यूज, दि. 20

शनिवारी सायंकाळी दिंडोरी तालुक्यात वरवंडी येथे आढळलेल्या बेवारस प्रेताची ओळख पटली आहे. इगतपुरी तालुक्यातील देवळे येथील रतन येसू तोकडे यांचे ते प्रेत आहे. कुठल्याही प्रकारचे ओळखीचे चिन्ह नसताना दिंडोरीचे पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड यांनी प्रेताच्या हातावर गोंदवलेल्या तोकडे आडनावावरून शोध लावला आहे. ह्याकामी इगतपुरीचे माजी सभापती रघुनाथ तोकडे यांनी साहाय्य केले. श्री. आव्हाड यांनी यापूर्वी घोटी पोलीस ठाण्यात काम केले असल्याने त्यांनी बेवारस व्यक्तीची ओळख पटविण्याचे अवघड काम सोपे करून दाखवले.

वरवंडी येथील महावीर पॉलिटेक्निक कॉलेजजवळ 50 वर्षीय अज्ञात व्यक्तीचे प्रेत बेवारस अवस्थेत सापडले होते. मयताच्या उजव्या हातावर काहीतरी अस्पष्ट असे तोकडे शब्द गोंदवलेले आढळले. माजी सभापती रघुनाथ तोकडे यांच्याशी पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड यांनी संपर्क साधल्यावर प्रेताची ओळख पटली. रतन येसू तोकडे ह्याला दारूचे व्यसन असून तो म्हसरूळ येथे आपल्या बहिणीकडे आला होता. मात्र त्याचे प्रेत बेवारस अवस्थेत सापडले होते. दिंडोरीचे पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड यांनी इगतपुरीचे माजी सभापती रघुनाथ तोकडे यांच्या मदतीने अनोळखी व्यक्तीच्या प्रेताची ओळख पटवली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!