इगतपुरीनामा न्यूज, दि. 15
मुंबई आग्रा महामार्गावर रायगडनगर जवळ नाशिककडून वाडीवऱ्हेच्या दिशेने जाणारी MH15 HT 9972 ह्या क्रमांकाची मोटरसायकल अपघातग्रस्त झाली. यामध्ये मोटारसायकलवरील 1 जण गंभीर जखमी झाला आहे. शरद मधु ढोन्नर 40 रा. शिरसाठे असे गंभीर जखमीचे नाव आहे. सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना कळवले. त्यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमीला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जनसेवक गोरख बोडके यांना माहिती मिळताव्ह तर तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल झाले. अपघातग्रस्त युवकाला वैद्यकीय मदत जलद देण्यासाठी त्यांनी मदत केली. त्यामुळे ह्या युवकाचा प्राण वाचवण्यासाठी मदत झाली. जखमीच्या नातेवाईकांनी गोरख बोडके, तुकाराम वारघडे, नरेंद्राचार्य रुग्णवाहीका यांचे आभार व्यक्त केले.