वाणिज्य शाखेमधून सीएमए ही उत्तम आणि अल्पखर्चिक करिअरची सुवर्णसंधी – सीएमए दीपक जोशी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 10

वाणिज्य विभागातील विद्यार्थांनी करिअर संधी शोधतांना वाणिज्य शाखेअंतर्गत येणाऱ्या पैलुंचा विचार करावा. त्यामुळे वाणिज्य शाखेतील पदवी घेताना त्याचा पाया पक्का झालेला असतो. ह्याचा उपयोग सीएमए म्हणजेच Career As a Cost and Management Accountants ह्या अल्पखर्चिक व्यावसायिक अभ्यासक्रमात होतो असे प्रतिपादन सीएमए दिपक जोशी यांनी केले. संगमनेर नगरपालिका कला, दा. ज. मालपाणी वाणिज्य व ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय आयोजित कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट्स या विषयावर करियर मार्गदर्शन ह्या एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी वाणिज्य विभागातील फायनान्स व अकाउंट्स क्षेत्रातील नवीन घडामोडी व जागतिक, राष्ट्रीय स्तरावर उपलब्ध संभाव्य करिअर संधी याबद्दल माहिती दिली.

त्याचबरोबर सीएमएसाठी उपयुक्त असणारी अभ्यासक्रमाची रचना, परीक्षा पद्धती संधी याबाबत मौलिक मार्गदर्शन सीएमए दिपक जोशी यांनी विद्यार्थांना केले. भविष्यात कॉर्पोरेट क्षेत्रात महत्वाची असणारी सॉफ्टस्किल तयारी अभ्यासक्रमासह  करून घेतली जाते. सीएमए ह्या कोर्सची प्रवेश प्रकिया सुरू असून विद्यार्थ्यानी अधिक माहितीसाठी संस्थेच्या नाशिक शाखेत अथवा ९४२३७३४९०० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. अरूण गायकवाड म्हणाले की विद्यार्थ्यानी वेळेचा सदुपयोग व नियोजन करून महाविद्यालयीन शिक्षणात व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अभ्यास करावा. सीएमए संदीप वडघुले, पदव्यूतर विभाग प्रमुख प्रा. ललिता मालुसरे, प्रा. लेंडे, विद्यार्थी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!