इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ – नाशिक येथील सर डॉ. एम. एस. गोसावी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या महाविद्यालयातील द्वितीय वर्ष फार्मसीची विद्यार्थीनी कु. समीक्षा देविदास गिरी हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे. मालेगाव येथे डॉ. बळीराम हिरे जयंती निमित्ताने आयोजित प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कर्मवीर भाऊसाहेब हिरे ट्रस्ट फार्मसी कॉलेज मालेगाव यांनी राज्यस्तरीय ओरल पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा घेतली. यामध्ये नॅनो पार्टीकल इन कॅन्सर थेरपी ह्या विषयावरील पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत कु. समीक्षा हिने प्रथम क्रमांक मिळवला. तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. अमृतकर, प्रा. कमलेश दंडगव्हाळ ह्यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तिचे गो. ए. सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी, संस्थेच्या एच. आर. डायरेक्टर प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, आस्थापना संचालक शैलेश गोसावी, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे .
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group