इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
गेला आठवडाभर नव्या रुग्णांच्या आकडेवारीपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची आकडेवारी सातत्याने वाढती होती. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे नव्याने सापडणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त होते. आज मात्र यात खंड पडला असून आज नव्या रुग्णांची आकडेवारी बरे झालेल्या रुग्णांपेक्षा जास्त आहे. इगतपुरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिलेल्या माहिती नुसार आज फक्त ४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज कोरोनाचे नवे १० रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात सध्या ८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही दोन अंकांवर आल्याने तालुक्याला दिलासा मिळाला आहे. आजही दोन अंकी संख्या कायम असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेने नव्या रुग्णांची संख्या आज जास्त आहे, त्यामुळे धोका अजूनही टळलेला नाही हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
मातोश्री हॉस्पिटल, श्रीराम वाडी घोटी येथे Star Health Insurance धारकांसाठी Cashless Facility सुरु झाली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - डॉ. जितेंद्र चोरडिया 9028399899
कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7030288008 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.