आदिवासी बांधव सर्वांना संस्कार आणि संस्कृती दाखवणारे दिशादर्शक – गोरख बोडके : एल्गार कष्टकरी संघटनेतर्फे धारगाव येथे आदिवासी दिन उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज – देशाच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असणारे आदिवासी बांधव सर्वांना संस्कार आणि संस्कृती दाखवणारे दिशादर्शक आहेत. त्यांनी स्वातंत्र्य चळवळींसह स्वराज्यासाठी बलिदान करून देशासमोर न फेडता येणारे ऋण करून ठेवले आहे. आदिवासींचा गौरव करतांना उर भरून येतो असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हा कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांनी केले. जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त धारगाव ता. इगतपुरी येथे एल्गार कष्टकरी संघटनेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की संस्कृतीचे रक्षक आदिवासी बांधव अजूनही उपेक्षित असले तरी येणारा काळ आदिवासींचा सर्वांगीण उत्कर्ष करणारा काळ ठरेल. यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे, इगतपुरीनामाचे संपादक भास्कर सोनवणे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते हजर होते.

Similar Posts

error: Content is protected !!