इगतपुरीनामा न्यूज, दि. २७
पिंपळगाव घाडगा येथील लोकनियुक्त सरपंच देविदास देवगिरे यांनी ग्रामविकास करण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. ग्रामपंचायत हद्दीत त्यांच्याकडून अनेक लोकोपयोगी उपक्रम कायम राबवले जातात. ह्यानुसार त्यांच्या अथक प्रयत्नांनी रोटरी क्लब, नीरजा ग्रुप, ॲक्वा प्लस यांच्या सहकार्याने उपयुक्त उपक्रम राबवण्यात आले. यामुळे ग्रामस्थांनी सरपंच देविदास देवगिरे यांचे आभार मानले.
पिंपळगाव घाडगा, गिऱ्हेवाडी, मेंगाळ वाडी येथे हायमास्टचे लोकार्पण करण्यात आले. विविध लोकोपयोगी कामांसाठी ३ वर्षासाठी गाव दत्तक घेण्यात आले. ह्या काळात गावाचा चेहरामोहरा बदलून विकसित गाव करणार असल्याचे सरपंच देविदास देवगिरे यांनी सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी मुग्धा लेले, विजुभाई दिनानी, प्रफुल्ल बरडीया, बेनिराल, कमलकर, हेमंत मराडे, उर्मी दिनानी, आदिती अग्रवाल, कीर्ती टाक, अभय परसेरे, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, इगतपुरीचे सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंदे, ग्रामविकास अधिकारी किशोर दळवे, पर्यवेक्षिका सुखदा पाराशरे, सरपंच ज्ञानेश्वर भोईर, भाऊसाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर आहेर, दिनकर घाडगे, धनंजय गोणके, राजू गोडे, महाराज जोशी, अनिल घाडगे, अनिल गवळे, राजू जोशी, एकनाथ शिंदे, समाधान टोचे, भाऊ गोडे, रखमा देवगिरे, बबन मेंगाळ, दशरथ गिऱ्हे, संजय मेंगाळ, देवराम देवगिरे, लक्ष्मण घाडगे, विष्णू जोशी, पप्पू मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना दत्तू देवगिरे यांनी तर सूत्रसंचालन लालू गारे यांनी केले.
पिंपळगाव घाडगा आणि परिसरात गोरगरीब आदिवासी नागरिकांची संख्या जास्त आहे. ग्रामपंचायतीमार्फत विविध विकासकामे सुरू असली तरी सामान्य नागरिकांसाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून कामे करीत आहोत. आगामी काळात अधिकाधिक कामे करणार आहोत.
- देविदास देवगिरे, सरपंच पिंपळगाव घाडगा