गोंदे फाट्यावर मोटारसायकलला अल्टोची धडक : गंभीर जखमी व्यक्तीला नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेमुळे मिळाले जीवदान

इगतपुरीनामा न्यूज, दि. २

मुंबई आग्रा महामार्गावर गोंदे दुमाला फाट्यावर आज दुपारी साडेचार वाजता नासिककडुन मुंबईकडे जाणारी अल्टो कार क्र. MH ४३ AT 7442 ह्या वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या MH 15 CN 9959 ह्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. उत्तम किसन काळे वय 60 रा. घोटी असे जखमीचे नाव आहे. अपघातग्रस्त व्यक्तीला जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या मोफत रुग्णवाहिकेच्या तत्पर सेवेमुळे जीवदान मिळाले आहे,

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!