इगतपुरीनामा न्यूज – वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमे अंतर्गत धडक कारवाई सुरु केली आहे. इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे, मुळेगाव, रायगडनगर भागात आज पहाटे ६ वाजेपासून पोलिसांनी पंधरा ते वीस किलोमीटर जंगलात पायी चालत जाऊन गावठी हातभट्ट्या तोडून गुन्हे दाखल केले. गावठी दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारे ६ लाख ३८ हजार इतक्या किमतीचे रसायन तसेच गावठी दारू पोलिसांनी यावेळी नष्ट केली. येथील जंगलात असलेल्या दुर्गम भागातील गावठी दारू बनवणाऱ्या हातभट्टीवर वाडीवऱ्हे पोलिसांनी शोध घेत छापा टाकला. यात गावठी दारू बनविण्यासाठी सडवलेले रसायन असे ६ लाख ३८ हजार किमतीची दारू पोलिसांनी यावेळी नष्ट केली. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात आज अवैध दारू बाबत तीन गुन्हे दाखल करण्यात आले. यापुढेही ही मोहीम अशीच सुरू राहणार असून कुठे दारू तयार अथवा विकली जात असेल तर तात्काळ वाडीवऱ्हे पोलिसांशी संपर्क साधावा. या मोहिमेत उपनिरीक्षक साळी, बिराडे, पोलीस नाईक प्रविण काकड, कांबळे, विशाल बोराडे, सोनवणे, टेकनर सहभाग घेतला.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group