घोटीच्या पेट्रोल पंपाजवळ ऑइल दुकान आगीमध्ये भस्मसात

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

घोटी येथील हिंदुस्तान पेट्रोलियम पंपाच्या बाहेरील एका ऑइल  दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे मोठी आग लागली. ही घटना आज रात्री 8 च्या सुमाराला घडली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धावपळ बघायला मिळाली. अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या टोल प्रशासनाच्या अग्निशामक दलाच्या वाहनाला येण्यास उशीर झाल्याने काही प्रमाणात परीसरात तणावाचे वातावरण होते. अग्निशामक दलाचे वाहन येईपर्यंत संपूर्ण टपरी जळून खाक झाली होती. त्यातच अग्निशामक वाहनाचा पाइप देखील नादुरुस्त असल्याचे बघायला मिळाले शेजारीच पेट्रोल पंप असल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. टपरीमधील चीजवस्तू जळून खाक झाल्या असून नुकसानीचा अंदाज अद्याप हाती आलेला नाही. 

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!