ओबीसी आरक्षणासाठी त्र्यंबकेश्वर काँग्रेसचे आंदोलन व रास्ता रोको

ज्ञानेश्वर महाले, इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ 

काँग्रेसतर्फे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी राज्यस्तरीय चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून त्र्यंबकेश्वर येथे काँग्रेसतर्फे तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्या  नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण अबाधित राहण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले. न्यायालयामध्ये ओबीसीसाठी केंद्र सरकारने कायदेशीर व प्रखर बाजू न मांडल्याने आरक्षण रद्द झाले आहे. यावरून केंद्र सरकारची ओबीसी समाजाबाबतची उदासीनता दिसून येते. यावेळी मधुकर लांडे, दिनकर मोरे, जयराम मोंढे, गणेश कोठुळे, सागर चव्हाण, यशवंत महाले, हरिभाऊ अंबापुरे, रोहिदास बोडके, छगन आचारी, भास्कर बदादे, काळु बदादे आदी उपस्थित होते. यावेळी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणदिवे, पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवून सहकार्य केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!