सिद्धिविनायक गणपती मंदिराकडून कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाला ४ लाखांची ग्रंथ बुक बँक वाटप

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७

कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांची ९१ वी जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर भाबड, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, ग्रंथपाल दिपाली शेंडे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मोहन कांबळे उपस्थित होते. वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन व पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले होते. त्याच्या उदघाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. पी. आर.भाबड यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी ग्रंथाच्या सहवासात असणे आवश्यक आहे. वाचनाने जीवन समृद्ध आणि संपन्न होत असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचन प्रेरणा जोपासावी असे मत व्यक्त केले.

उपप्राचार्य प्रा.  देविदास गिरी यांनी एपीजे अब्दुल कलाम यांच्या अनेक ग्रंथांचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आणि आनंदही शिक्षणासाठी वाचन संस्कृती विकसित केली पाहिजे असे मत केले. ग्रंथालय विभागाच्या ग्रंथपाल दिपाली शेंडे यांनी प्रास्ताविक व्यक्त करत असताना भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्राबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देऊन वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व व्यक्त केले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त सिद्धिविनायक गणपती मंदिर प्रभादेवी, मुंबई यांच्या वतीने विद्यार्थ्यांना चार लाख रुपयांची ग्रंथ बुक बँक याप्रसंगी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मोहन कांबळे यांनी व्यक्त केले तर आभार प्रदर्शन डॉ. आर. डी. शिंदे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला अनेक विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!