इगतपुरीनामा न्यूज, दि. 10
मुंबई आग्रा महामार्गावर खड्ड्यांची समस्या लोकांच्या जीवावर बेतत आहे. इगतपुरी येथील हॉटेल ग्रीनलँडजवळ खड्डा चुकवण्याच्या नादात मोटारसायकल घसरल्याने अपघात झाला. यामध्ये 2 युवती जखमी झाल्या आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र कैलास गतीर यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. MH 15 BF 5774 हा मोटारसायकलचा क्रमांक असून चैताली पवार वय 26, स्वीटी साळुंखे वय 28 दोघी राहणार नाशिक अशी जखमी युवतींची नावे आहेत.