कोरोनामुक्तीच्या दिशेने : अवघ्या ६ जणांवर उपचार सुरू

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

तालुक्यातील कोरोना रुग्णांची आजची आकडेवारी तालुकावसियांसाठी दिलासादायक असून मध्यंतरी 10 वर अडकलेला आकडा आता पुन्हा कमी होतांना दिसत आहे. आज आलेल्या अहवालानुसार तालुक्यात अवघ्या १ रुग्णाची भर पडली असून ३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या तालुक्यात अवघ्या ६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १० वर स्थिरावलेली रूग्णसंख्या आता आणखी कमी व्हायला सुरुवात झाल्याने कोरोना मुक्तीच्या दिशेने तालुक्याची वाटचाल सुरू असल्याचे निश्चित आहे. दरम्यान रुग्णसंख्या कमी होत असली तरी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी केले आहे.

सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!