इगतपुरीनामा न्यूज, दि. 29
दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे संपूर्ण भारतभर घेतल्या जाणाऱ्या जुलै २०२२ परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत नाशिक शाखेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली. त्यांनी यावर्षीही घवघवीत यश संपादन केले आहे. वाणिज्य क्षेत्रात सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या सीएमए परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परिक्षांचे आयोजन हे केंद्र सरकारच्या “दि इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडिया अर्थात ICMAI या संस्थेतर्फे केले जाते. दि इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडियाच्या वतीने १२ वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वप्रथम फाउंडेशनही परीक्षा घेण्यात येते. परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे पुढील इंटरमेडिएट परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात.
“दि इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडियातर्फे” जुलैमध्ये अखिल भारतीय स्तरावर ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षांचा निकाल २७ सप्टेंबरला जाहीर झाला. नाशिक विभागातून इंटरमिजीएट परीक्षेसाठी ३२५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३६ विद्यार्थी इंटरमिजीएट परीक्षा उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम निकिता सावलानी, द्वितीय राजश्री गिरासे, तृतीय तेजस कांकरिया यांचा समावेश आहे. फायनलच्या यशस्वी विद्यार्थ्यांपैकी प्रथम अमित त्रिपाठी, द्वितीय ललित जाखडी, तृतीय अमोल रानडे यांचा समावेश आहे. ICMAI नाशिक शाखेचे अध्यक्ष सीएमए भुषण पागेरे,
स्टुडंट डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष सीएमए अरिफखान मन्सूरी, प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष सीएमए कैलास शिंदे, मीडिया आणि पब्लिक रिलेशनशिप कमिटीचे अध्यक्ष सीएमए निखिल पवार, उपाध्यक्ष सीएमए दिपक जगताप, सचिव सीएमए अर्पिता फेगडे, खजिनदार सीएमए मयुर निकम, सीएमए स्वप्नील खराडे, सीएमए दिपक जोशी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.