बळीराजासाठी विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ शेतकऱ्यांच्या बांधावर : माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी अभियानात इगतपुरी तालुक्याची आघाडी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 28

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी अभियानात कृषि अधिकारी यांनी संपुर्ण दिवस शेतकऱ्यांसमवेत संवाद साधून त्यांच्या कृषि विषयक अडीअडचणी, शंका यांचे निरसन करणे अपेक्षित आहे. यालाच अनुसरुन विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद साधला. आंबेवाडी व खेड येथील शेतकऱ्यांसमवेत समाजमंदिर, ग्रामपंचायत सभागृह येथे सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी पिक विमा, मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड, आगामी रब्बी हंगाम नियोजन, वनराई बंधारे नियोजन, शेततळे, वनपट्टेधारक शेतकऱ्यांसाठी जमीन सपाटीकरण, फळबाग लागवड, कुक्कुटपालन, पशुसंवर्धन, शेळी मेंढीपालन, मधुमक्षिका पालन, भात पासुन तयार होऊ शकणारे उपपदार्थ, त्यांची विक्री व्यवस्था आदी विषयांवर मार्गदर्शन केले. पाण्याची कमी उपलब्धता असल्याने कमी कालावधीचे पिके घेण्यासाठी त्यांनी सांगितले. कृषि पर्यटन, शेतमालाची विक्री व्यवस्थापन, मत्स्यपालन, जलसंधारणाची कामे, पिक कर्ज, ठिबक व तुषार सिंचन योजना याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करुन त्यांच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या. याप्रसंगी शेतकऱ्यांनीही विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.

त्यांनी खडकेद येथील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत नागली पिक प्रात्याक्षिकास भेट देऊन पाहणी करून मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी चाकोरीबध्द शेती ऐवजी नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन शेती करावी. उत्पादन खर्चात बचत करुन उत्पन्न वाढवावे, केवळ शेतीच्या भरवसावर अवलंबून न राहता कुक्कुटपालन, पशुसंवर्धन, यासारख्या जोडधंद्याकडे वळावे असे त्यांनी आवाहन केले. याप्रसंगी तालुका कृषि अधिकारी शितलकुमार तंवर यांनी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी अभियान संदर्भात शेतकऱ्यांना माहिती दिली. शेतकऱ्यांना शेती संदर्भातील येणाऱ्या अडचणी कशा सोडवता येतील यासाठी या अभियाना दरम्यान प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. इगतपुरी तालुक्यातील भेटीत विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी टाकेघोटी, बोरटेंभे, कुंरुगवाडी, आंबेवाडी, खडकेद, खेड येथील शेतकऱ्यांना कृषि विभागामार्फत यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानप्राप्त शेतकऱ्यांच्या औजारांची पाहणी केली. खेड येथे नवीन यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हस्ते पुर्वसंमती पत्र देण्यात आले. खेड येथील समृध्द किसान राईस फार्मिंग कंपनीच्या सचिवांशी मोहन वाघ संवाद साधला.

तालुका कृषि अधिकारी इगतपुरी यांच्या विद्यमाने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी अभियान अंतर्गत नाशिक विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आंबेवाडी व खेड येथील कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य कैलास नाडेकर, उपसरपंच राधाकिसन सदगीर, माजी सातपानच मारुती केकरे, बचत गट अध्यक्ष कैलास भांगरे, राजाराम शिळकंदे, कैलास वाजे, संपत वाजे, बाळू कचरे, रंगनाथ वाजे, लहानू वाजे, बाळू वाजे, योगेश बोद्रे, सुभाष आंबवणे, तानाजी वाजे, मंडळ कृषि अधिकारी भास्कर गिते, कृषि पर्यवेक्षक किशोर भरते, कृषि सहाय्यक शांताराम गभाले, देवेंद्र पाटील, विजय कापसे व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हितेंद्र मोरे उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!