इगतपुरीनामा न्यूज, दि. 28
शारदादेवी शिक्षक पतसंस्थेला ७५ लाख ५८ हजार २७६ इतका विक्रमी नफा झाला आहे. नाशिक जिल्ह्यात कमी वेळेत नावलौकिक मिळवलेल्या ह्या पतसंस्थेचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ शिक्षक नेते शिवाजी राजे निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे अध्यक्ष रामदास घडवजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेमध्ये ह्या आर्थिक वर्षात सभासदांना ७.५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. कर्जमर्यादा १२ लाख ५० हजारावरून १५ लाख ५० हजार अशी करण्यात आली.
यावेळी उमेश महाजन, शांतीलींग तांदळे, सुर्यभान बोराडे, प्रभाकर जोंधळे, राजाराम गायकर, अरुण देवरे, उत्तम साबळे यांनी अनेक विषयावर चर्चा केली. सभासदांच्या अनेक प्रश्नांची योग्य व समर्पक उत्तरे संस्थेचे अध्यक्ष रामदास घडवजे, कार्यवाह दगडु तेलोरे, जेष्ठ संचालक विनायक लाड यांनी दिली. ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. जेष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब सूर्यवंशी,नरेंद्र ठाकरे, मोहन चकोर, विजया पाटील देवरे, ज. ल.पाटील, बाळासाहेब ढोबळे, भास्कर देवरे, बी. आर.पाटील, रामराव बनकर, समीर जाधव, मुकुंद जाधव, छोटु दादा शिरसाठ, केशव राव, आहेर सर तुषारराव पाटील, भारती शिंदे, विठ्ठल उगले, प्रभाकर जोंधळे, बाळासाहेब सोनवणे, एकनाथ भोकनळ, संजय धात्रक, सर्व संचालक मंडळ, अध्यक्ष रामदास घडवजे, कार्यवाह दगडु तेलोरे, विनायक लाड, विलास सानप, मोहन निकम, सतीश पवार, देवेंद्र ठाकरे, कैलास सुर्यवंशी, दिनेश देवरे, योगेश कांगणे विकास सहाणे, शरद काळे, विश्राम कोठुळे, नारायण कुंवर, राजश्री ससाणे, सुनिल शिंदे, योगेश नाठे आदी उपस्थित होते.