इगतपुरी रेल्वे स्थानकात पोलिसांकडून कडक तपासणी

शैलेश पुरोहित, इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

इगतपुरी हे रेल्वे स्थानक मध्य रेल्वेचे महत्वाचे स्थानक आहे. देशातील विविध भागात जाण्यायेण्यासाठी या स्थानकावरून भरपूर गाड्या येत जात असतात. ह्या अनुषंगाने इगतपुरी रेल्वे स्थानकाच्या सर्व भागात आणि रेल्वे गाड्यांमध्ये श्वान पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. १५ ऑगस्टला होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून आलेल्या सूचनेनुसार ही कडक तपासणी करण्यात आली. लोहमार्ग पोलीस ठाणे, रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे विभागाच्या वतीने ही सूक्ष्म तपासणी करण्यात आली. यावेळी तिकीट ऑफीस, पार्सल ऑफिस, प्लॅटफॉर्म, पूल व येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची आणि त्यांच्या साहित्याची तपासणी करण्यात आली.