इगतपुरीनामा न्यूज, दि. 28
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे गोवंशातील जनावरांना लंपी आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु झाले आहे. गोंदे दुमाला औद्योगिक वसाहत ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच शरद सोनवणे, उपसरपंच शोभा राजाराम नाठे, गणपत जाधव, कचरु धोंगडे यांच्या हस्ते आज लसीकरण सुरु करण्यात आले. यावेळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश नेहते, सहाय्यक पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गौरव मगर, डॉ. गणेश धोंगडे, राहुल निरगुडे, ग्रामपंचायत सदस्य परशराम नाठे, कृष्णा सोनवणे, सिताबाई नाठे, सविता नाठे, लिलाबाई नाठे, शिवानंदबाबा बेंडकुळे, दीपिका नाठे, वैशाली नाठे उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी विजयराज जाधव, लिपिक सुनील नाठे, भाऊसाहेब कातोरे, माधव नाठे, मंगेश सोनवणे, राहुल सोनवणे, समाधान तपासे, धीरज सोनवणे, अशोक नाठे, सन्नी सोनवणे आणि शेतकरी बांधवांनी लंपी आजाराच्या लसीकरणाबाबत समाधान व्यक्त केले.