महामार्गावर चालत्या ट्रकने अचानक पेट घेतला : जीवितहानी नाही ; अग्निशमन दलाची वाहने दाखल

इगतपुरीनामा न्यूज, दि. 22

मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. आठवा मैल येथील निर्मळ आश्रमाजवळ ह्या चालत्या ट्रकने अचानक पेट घेतल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. ट्रकच्या चालकाने प्रसंगावधान राखत खाली उतरल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. बघता बघता पूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असून महामार्ग पोलीस, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न शर्तीने सुरू आहेत. यामुळे मुंबई आग्रा महामर्गाची वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली आहे तर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले.

Leave a Reply

error: Content is protected !!