नवनाथ गायकर : इगतपुरीनामा न्यूज, दि २
बँक ऑफ महाराष्ट्र प्रायोजित व महाबँक आर-सेटी प्रशिक्षण संस्थेतर्फे खाद्य पदार्थ ( फास्ट फूड स्टॉल ) उद्यमी व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधी १० दिवसाचा असून यामध्ये विविध प्रकारचे खाद्य-पदार्थ ( फास्ट फूड ) बनवणे, नास्ता, मिसळ, दाक्षिणात्य पदार्थ तयार करणे, सॉस, जॅम, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, जागेची निवड, शासकीय परवाने, विक्री व्यवस्थापन, ग्राहक कौशल्य, उद्योजकता, क्षमता व व्यक्तिमत्व, बाजारपेठ सर्व प्रत्यक्ष फास्ट फूड युनिटला भेट, मार्केटिंग, उद्योग सूरू करण्यासाठी भांडवलाचे नियोजन, कर्ज योजना, प्रकल्प अहवाल, फूड लायसेन्स बद्दल माहिती देण्यात येईल. प्रशिक्षणावेळी जेवण, नास्ता, चहा, रहाणे मोफत आहे. प्रशिक्षण कालावधी १० ते १९ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे. ७ डिसेंबरला प्रत्यक्ष मुलाखत घेऊन निवड केली जाणार आहे. मुलाखतीसाठी महाबँक आर-सेटी प्रशिक्षण संस्था गोवर्धन ग्रामपंचायतीच्या शेजारी गोवर्धन गंगापूर नाशिक पत्त्यावर सकाळी साडेदहा वाजता उपस्थित रहावे. हे प्रशिक्षण फक्त नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या रहिवाश्यांसाठी आहे. वयाची अट १८ ते ४५ अशी आहे.
अधिक माहितीसाठी राजेंद्र पवार 9890383894, 9156387413, प्रफुल्ल आहिरे 9421472268 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. ज्याचे छोटे मोठे फूड स्टाल व्यवसाय सुरू असेल, किंवा ज्यांना व्यवसाय सुरू करावयाचा असेल अशा व्यक्तींसह ऊत्पादक महिला बचत गट, नव उद्योजक पुरुष व महिला यांना प्राधान्य दिले जाणार आहे. मुलाखतीला येताना दारिद्र्यरेषेखालील कुटुंब दाखला, मनेरेगा जॉब कार्ड लाभार्थी, बचत गट सभासद, आधार कार्ड ( दोन प्रती ), रेशनकार्ड, बँक पासबुक, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान कार्ड, पासपोर्ट साइज फोटो यासह मुलाखतीला येणे अनिवार्य आहे.