जगदंबा मातेच्या यात्रेनिमित्त नांदगाव बुद्रुकला रंगली कुस्त्यांची विराट दंगल : विजेत्या कुस्तीपटूंना रोख बक्षिसे आणि ढाल देऊन ग्रामस्थांनी केले सन्मानित

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – ग्रामीण भागात कुस्तीला मोठे महत्व आहे. पहिलवानांना कुस्त्यांच्या दंगलीची आस लागलेली असते. म्हणून इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे जगदंबा मातेच्या यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल अतिशय लोकप्रिय आहे. प्रचंड उपस्थितीत पार पडलेल्या या दंगलीत ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळाला. विजेत्या कुस्तीपटूंना रोख  बक्षीस, ढाल आणि श्रीफळ देऊन ग्रामस्थांच्या वतीने  सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आजी माजी सैनिकांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी, नाशिक आदी ठिकाणाहून कुस्तीपटू मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

दरवर्षी यात्रेनिमित्त कुस्तीची दंगल नांदगाव बुद्रुक येथे पहावयास मिळते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत अनेक पहिलवान आखाड्याच्या मदतीने कुस्तीचे धडे गिरवत असतात. ग्रामीण भागातील कुस्त्यांच्या दंगली म्हणजे त्यांचा जीव की प्राण असतो. नांदगाव बुद्रुक येथे कुस्ती खेळण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या कुस्तीचे नेतृत्व लष्करी जवान शंकर गावंडे, पहिलवान संदीप गायकर, सचिन गायकर, ज्ञानेश्वर पागेरे, शंकर गायकर यांनी केले. गुरू हनुमान आखाड्याचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, भाऊसाहेब शिंदे, भरविरचे माजी सरपंच दत्तू जुंद्रे, साकुरचे सरपंच विनोद आवारी, मोहन कातोरे, सरपंच अनिता देवा मोरे, उपसरपंच मनीषा दिनकर गायकर, हिरामण गायकर, सुखदेव गायकर, भाऊसाहेब मांडे, तानाजी गायकर, मोहन झोमान, दत्तू गायकर, रमेश माळी,  बबन पावडे, लहानु पगारे, अरुण शिरसाठ, योगेश पाळदे, व्यापारी बँक सल्लागार सुभाष गायकर, वसंत गायकर,  पुजारी लक्ष्मण महाजन, विलास संधान, शालेय  समिती अध्यक्ष दादाभाऊ शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते देवा मोरे, दिनकर गायकर विजय गावंडे , रंगनाथ खातळे, गावातील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!