संजीवनी आश्रमशाळेत वन विभागातर्फे चित्रकला स्पर्धा आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी प्रादेशिक वनपरिक्षेत्र विभागाच्या वतीने येथील संजीवनी आश्रमशाळेत जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यात आला. पश्चिम वन विभागाचे उपवनसंरक्षक पंकजकुमार गर्ग व सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्यासह इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. इगतपुरी  वनपरीमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, वनरक्षक फैजअली सय्यद, मालती पाडवी, गौरव गांगुर्डे, सोमनाथ जाधव आदींनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. संजीवनी आश्रमशाळेत जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने वन्य प्राण्यांचा वावर, आपण घ्यावयाची काळजी या विषयावर विद्यार्थ्यांचे उद्बोधन करण्यात आले, याच विषयांवर चित्रकला स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एम. एम.  गोसावी यांच्यासह वस्तीगृह कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!