इगतपुरीनामा न्यूज, दि. 17
महामार्गावरील जीवघेणे खड्डे नागरिकांच्या जीवाला खड्डे पाडत आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर खड्ड्यांमुळे आठवा मैला जवळ आज रात्री सव्वाआठ वाजता एका मोटार सायकलचा अपघात झाला. इगतपुरीकडून नाशिकच्या दिशेने जाणारी MH 15 GB 6138 ह्या क्रमांकाची मोटारसायकल पाण्यातील मोठ्या खड्ड्यात गेल्याने अपघात झाला. यामध्ये संजय चंद्रकांत जाधव वय 32, सुदाम पुंडलिक खाडे वय 42 दोघे रा. सारुळ ता. जि. नाशिक हे दोघे गंभीर जखमी झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य वाढत असून संबंधित यंत्रणा डोळेझाक करीत आहे. त्यामुळे वाहनांचे नुकसान, जीवाला धोका चांगलाच वाढला आहे.