इगतपुरीनामा न्यूज – भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सोशल मिडियावर अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला. यात किरीट सोमय्या हे अतिशय गलिच्छ पद्धतीने मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करतांना दिसत आहेत. या व्हिडिओची सत्यता तपासणी करून नक्की यात दोषी जे कोणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज राष्ट्रपती, राज्यपाल, गृहमंत्री यांच्याकडे जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांनी पत्राद्वारे केली आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी सीबीआय चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा जिजाऊ ब्रिगेड रस्त्यावर उतरून निषेध करेल. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे पत्रात म्हटले आहे.
पत्रात म्हटले आहे की, किरीट सोमय्या हे भाजपाचे मोठे नेते आहेत. त्यांनी हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांच्यासारख्या अनेक नेत्यांच्या चौकशा करून त्यांना तुरुंगवास घडवला आहे. त्यांनी असा गलिच्छ प्रकार करणे म्हणजे त्यांची दुसरी काळी बाजू समोर आली आहे. विनाकारण त्यांना कोणी बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला असेल किंवा किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ खरा असेल तर सत्यता तपासून त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी. महिला आयोगाने या विषयी आपली भूमिका जाहीर करावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासह राज्यपाल, राष्ट्रपती यांनीही सुद्धा या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी असेही पत्रात नमूद आहे.
लोकप्रतिनिधी, नेते मंडळी यांचे वागणे, बोलणे सुसंस्कृत आणि समाजाला दिशा देणारे असावे. अश्लील वागणे, अश्लील व्हिडिओ बनवणे कलंकित प्रकार आहे. दोन-तीन वर्षात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. राजकीय सामाजिक क्षेत्रातील महिलांवर गलिच्छ आरोप करून बदनाम करण्याचे षडयंत्र करण्याचे प्रकार वाढले आहेत. यात राज्य महिला आयोग सपसेल अपयशी ठरला आहे. ह्या प्रकरणाची त्रयस्थ यंत्रणांमार्फत चौकशी होणे आवश्यक आहे.
- माधुरी भदाणे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड