इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
इगतपुरी तालुक्यात आज दोन अपघात झाले. पहिला अपघात मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना जुन्या कसारा घाटात झाला. यामध्ये कंटेनर क्रमांक MH 46 BM 0722 च्या चालकाचा हिवाळा ब्रीज जवळ कंटेनरवरचा ताबा सुटल्याने कंटेनर संरक्षक कठडे तोडून दरीत जाऊन कोसळला. यात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र घोटी, आपत्ती व्यवस्थापन टीमने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन कंटेनर चालकाला दोरीच्या सहाय्याने दरीतून बाहेर काढले. हिटलर सिंग वय 40 असे चालकाचे नाव असून त्याला पुढील उपचारासाठी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक कैलास गतीर यांच्याद्वारे इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुसऱ्या अपघातात मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या चारचाकीचे टायर गोंदे जवळ फुटल्याने मोटरसायकल चालकास जोरदार धडक बसली. यामध्ये मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे रुग्णवाहक निवृत्ती गुंड यांनी मोफत रुग्णवाहिकेतुन नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. अमर सूर्यकांत पवार वय 45 राहणार खोडाळा असे जखमीचे नाव आहे.