
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
मुंबई आग्रा महामार्गावर गोंदे फाट्याजवळ नासिकहुन मुंबईकडे जाणारा कंटेनर क्रं. MH 46 F 1838 ह्याने स्कुटी क्रं. MH 15 HJ 4098 हिला कट मारल्याने अपघात झाले. यामध्ये स्कुटीवरचा मुलगा आणि आई जखमी झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. दिनकर भाऊसाहेब भोर वय 32, ताराबाई भाऊसाहेब भोर वय 52 दोघे अशी जखमींची नावे आहेत.