इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
नासिक जिल्हा गावकामगार पोलीस पाटील संघाची जिल्हा कार्यकारणी बैठक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब पाटील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. राज्य संघटक नवनाथ पाटील धुमाळ व जिल्हाध्यक्ष चिंतामण पाटील मोरे, जिल्हासचिव अरुण पाटील महाले, सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भंडारे पाटील व जिल्ह्यातील पोलीस पाटील प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी संघाची जिल्हा कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली. नवी कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे – जिल्हाध्यक्ष अरुण बाबुराव बोडके ( निफाड ), जिल्हा सचिव रविंद्र दगडू जाधव ( नाशिक ), कार्याध्यक्ष किरण पाटील ( बागलाण ), कार्यकारी अध्यक्ष मुकेश कापडी ( सिन्नर ), उपाध्यक्ष अनिल गडाख ( निफाड ), शंकर तुंगार ( पेठ ), मच्छिंद्र खातळे ( इगतपुरी ), मुज्जमील चौधरी ( येवला ), बबन बेंडकुळे ( नाशिक ), भगवान बागुल ( कळवण ), खजिनदार सुभाष कामटी ( त्र्यंबकेश्वर ), सहखजिनदार कृष्णा गरड(नाशिक), सहसंघटक दत्तात्रय आहेर ( येवला ), रविंद्र सरोदे ( नांदगाव ), परशराम चौधरी ( सुरगाणा ), प्रसिद्धी प्रमुख कैलास फोकणे ( इगतपुरी ), मारुती पिंगट ( येवला ), निमंत्रक गजानन पाटील भोर ( नाशिक ), सदस्य रोशन सावकार ( सटाणा ), महिला प्रतिनिधी सुनीता बोडके ( दिंडोरी ), सविता पोळ ( चांदवड )
यावेळी चिंतामण पाटील मोरे ( दिंडोरी ) यांची राज्य सल्लागार समिती अध्यक्षपदी, संपतराव जाधव ( चांदवड ) यांची राज्य उपाध्यक्ष तर राज्य निमंत्रकपदी सोमनाथ मुळाणे ( दिंडोरी ), अशोक सांगळे ( दिंडोरी ) राज्य संपर्क प्रमुखपदी बाळासाहेब पवार ( सिन्नर )यांची निवड करण्यात आली. राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी राज्य पोलीस पाटील संघाच्या ध्येयधोरण व वाटचालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तहसीलदार दीपक पाटील, पोलीस निरीक्षक सारिका आहिरराव यांनी नवीन कार्यकारणीचे अभिनंदन करून मार्गदर्शन केले. नाशिक तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील बेझेकर व नाशिक तालुका प्रतिनिधी यांनी राज्याध्यक्ष व प्रमुख उपस्थितांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. माजी जिल्हाध्यक्ष चिंतामण पाटील मोरे यांनी प्रास्ताविक केले नूतन अध्यक्ष अरुण बोडके यांनी मनोगत व्यक्त केले. रवींद्र जाधव यांनी आभार व्यक्त केले.