
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
भारत सरकार ग्राहक मंत्रालयांतर्गत ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड प्रोत्साहित स्टॅंडर्ड क्लब जनता विद्यालय घोटीतर्फे स्टॅंडर्ड रायटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये विद्यालयातील 50 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विद्यालयाचे मुख्याध्यापक साहेबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणात प्रत्येक वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचण्यापर्यंत भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय मानक ब्युरोकडून कसे प्रमाणित केले जाते याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी स्टॅंडर्डचे महत्व समजावून सांगितले. स्टॅंडर्ड क्लबचे मार्गदर्शक अविनाश निकम यांनी विद्यार्थ्यांना वस्तू कशा प्रमाणित केल्या जातात याविषयी माहिती दिली.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक नेहा धनाजी जाधव, प्रज्ञा दिलीप रुपवते,.द्वितीय क्रमांक समीक्षा दत्तात्रय पाबळकर, चतुर्थी दीपक आंबेकर, तृतीय क्रमांक पायल गोविंद भगत, ऐश्वर्या रमेश पगारे, उत्तेजनार्थ म्हणून चंदना चव्हाण व वैष्णवी देवकर यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बाळासाहेब कलकत्ते, नवनाथ जाधव आदी उपस्थित होते.