९ लाखांच्या अपहारप्रकरणी उद्या इगतपुरी पंचायत समिती समोर उपोषण : पिंपळगाव मोर ग्रामपंचायत सदस्या सुमन गातवे यांचा इशारा

इगतपुरीनामा न्यूज – पिंपळगाव मोर येथील ग्रामसभा कोषनिधी ( पेसा ) समितीने बँक खात्यातुन ९ लाखांचा अपहार केला म्हणून गतवर्षी मे महिन्यात सरपंचांनी गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांना कळवले होते. पंचायत समितीने याबाबत कायदेशीर कारवाई न केल्याने ग्रामपंचायत सदस्या सुमन युवराज गातवे ह्यांनी सप्टेंबरमध्ये एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. पंचायत समितीने आठ दिवसात गुन्हा दाखल करण्याचे लेखी पत्र दिले. परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसून संबंधितांवर गुन्हा दाखल झालेला नाही. याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्या सुमन गातवे उद्या २० फेब्रुवारीपासून इगतपुरी पंचायत समितीसमोर उपोषण करणार आहे अशी माहिती ग्रामपंचायत सदस्या सुमन युवराज गातवे यांनी दिली. निवेदनात म्हटले आहे की, गावच्या विकासासाठी महत्वाचा असणारा ग्रामसभा कोषनिधी ( पेसा ) असतो, कोषसमितीनेच ह्या निधीवर डल्ला मारला आहे. गेल्या नऊ महिन्यापासून पत्रव्यवहार करूनही पंचायत समिती कारवाई करत नसल्याने न्याय कुठे मागायचा हा प्रश्न प्रश्नच राहिला आहे. म्हणून उपोषण करणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, इगतपुरी व घोटी पोलीस ठाणे आदी ठिकाणी निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!