
इगतपुरीनामा न्यूज – पतिपत्नी ऍक्टिवा स्कुटीने टिटवाळा मुंबई येथून अंबासनकडे जातांना रात्रीच्यावेळी जात होते. मुंबई नाशिक महामार्गावरील राजूर बहुला शिवारातील निर्मल आश्रमाच्या पुढे फिर्यादीचे पती लघुशंकेसाठी थांबले असताना रस्त्याने समोरून रॉंग साईडने मोटरसायकलवरून त्यांच्याजवळ दोन जण आले. त्यांनी स्कुटीची चावी काढत, गच्ची धरून धक्काबुक्की, मारहाण शिविगाळ केली. तेव्हा फिर्यादी महिलेने आरडा ओरड केल्याने लोकांची गर्दी जमा झाली. हे बघून एका आरोपीने महिलेला धक्का दिला. दुसऱ्या आरोपीने फिर्यादी महिलेच्या हातातील १० हजार किमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकाऊन चोरी करून नेला. त्यानुसार वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 309 (4),118 (1), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल होता. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे आणि तपास पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे. संशयित आरोपी हरिओम अरविंद सिंग, वय 22 वर्ष, ऋषिकेश अशोक राजगिरे वय 24 वर्ष दोन्ही रा. घरकुल योजना चुंचाळे शिवार, अंबड, ता. जि. नाशिक यांना अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल फिर्यादीचा मोबाईल व वापरलेले वाहन हस्तगत केले आहे. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, पीएसआय बिऱ्हाडे, प्रविण काकड, धारणकर, सोनवणे, गांगुर्डे, विशाल बोराडे, लहामटे यांनी ही कामगिरी केली.