साकुरजवळ पावसामुळे खराब झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा : काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे यांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

साकुर गावाजवळ आमराई मळा येथे शेताच्या वळणावर रस्त्याचा बहुतांश भाग हा ढगफूटीच्या पावसाने वाहून गेला आहे. त्यामुळे येथे प्रवास करणाऱ्यांना अपघात होण्याची शक्यता आहे. म्हणून कुठलीही अनुचित हानी होऊ नये यासाठी संबंधित रस्ता प्राधिकरणाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यांनी तातडीने रस्त्याची दुरूस्ती करावी. संबंधित शेतकऱ्यांना भराव वाहून आल्याने शेताची झालेली नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे यांनी रस्ते प्राधिकरणाकडे केली आहे.

साकुर फाटा ते व्हिटीसी फाटा दरम्यान राज्य महामार्ग उपरस्ता ३४ ब हा घोटी सिन्नर महामार्ग ते मुंबई आग्रा महामार्ग यांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्याने पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, सिन्नर येथून मोठ्या प्रमाणात औद्योगिक मालाचे मोठमोठे कंटेनरने वाहतूक सतत चालू असते. एसएमबीटी हॉस्पिटल व वैद्यकीय शिक्षणासाठी येथे हजारो रूग्ण, विद्यार्थी, डॉक्टर व इतर स्टाफ ये जा करत असतो. स्थानिक पंचक्रोशीतील गावांसाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. अशा या रस्त्यावर साकुर गावातील आमराई मळा येथे वळणावर रस्ता गेला वाहून गेल्याने बाळासाहेब कुकडे यांनी मागणी केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!