पाडळी देशमुख सोसायटीच्या स्विकृत संचालकपदी रामदास जाधव यांची निवड

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २३

इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रगतशील शेतकरी तथा बीएसएनएलचे निवृत्त कर्मचारी रामदास जाधव यांची स्विकृत संचालकपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीने संस्थेस बळकटी येईल असा विश्वास सर्व ग्रामस्थांनी व्यक्त केला. पाडळी देशमुख सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड काही दिवसांपूर्वी झाली आहे. आजच्या सर्वसाधारण सभेप्रसंगी संस्थेच्या स्वीकृत संचालक निवडीसाठी ग्रामस्थांनी रामदास जाधव यांच्या नावाची एकमताने निवड केली. यावेळी नवनिर्वाचित स्वीकृत संचालक रामदास जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बंँक निरीक्षक मुरलीधर बोंबले, संस्थेचे चेअरमन विष्णू धोंगडे, व्हॉइस चेअरमन विलास धांडे, सरपंच खंडेराव धांडे, जेष्ठ संचालक रामभाऊ धांडे, रामदास पाटील धांडे, रामकृष्ण धोंगडे, कचरू गवारी, माजी सरपंच जयराम धांडे, संजय धोंगडे, बळवंत धांडे, रामभाऊ धोंगडे, दिनेश धोंगडे, शिवाजी जाधव, संस्थेचे सचिव देविदास नाठे, मंगेश खैरनार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!