इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद नासिकच्या रावसाहेब थोरात संपन्न झाली. या आर्थिक वर्षात 1 कोटी 38 लाख रुपये निव्वळ नफा झाल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन श्री. नितीन पवार, व्हॉइस चेअरमन पांडुरंग वाजे, सचिव संदीप दराडे यांनी दिली. यावेळी 2021-22 या आर्थिक वर्षांमधील सांपत्तीक स्थितीचा आढावा देण्यांत आला. सर्व १ ते ९ विषयांना खेळीमेळीच्या वातावरणात एकमताने मंजुरी देण्यात आली. २०१८ पासुन इमारत निधीसाठी १० लाख पाच वर्षासाठी दिले होते. त्यात पुन्हा नव्याने सभासदांनी १० लाख रूपये घेण्याला मान्यता दिली. मयत सभासदांच्या वारसांना कल्याण निधी अनुदान २५ हजार रूपये देण्यात येणार आहे. सभासद कुटुंब कल्याण योजनेव्दारे वारसांना १ लाख मदत करण्यात येत आहे. ७ लाख कर्ज वितरीत केले जात असुन कर्जावरील व्याजदर १०.५० नुसार केली जात असल्याची माहिती देण्यात आली.
सभासद मागणी नुसार सर्वसाधारण सभेत सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. सभेला संचालक विजयकुमार हळदे, राजेंद्र भागवत, मधुकर आढाव, पंडीत कटारे, गोटीराम खैरनार, विकम पिंगळे, भाऊसाहेब पवार, नितीन भडकवाडे, किशोर वारे, विमल घोडके, मंगला वोरसे, सभासद रविंद्र थेटे, विलास शिंदे, हरिश्चंद्र रणमाळे, दिलीप वारे, उत्तम चौरे, प्रकाश थेटे, चंद्रशेखर पाटील, अनिल सानप, भगवान पवार, श्रीपाद जोशी, बाळासाहेब पाटील, महेंद्र पवार, सलीम पटेल, नंदकिशोर सोनवणे, सचिन विंचूरकर, दिनकर सांगळे, कैलास मंडलिक, प्रशांत कवडे, ललित घारे, अजित आव्हाड, दत्तात्रय मदने, साईनाथ ठाकरे, सतिश बच्छाव, दत्तात्रय बेलेकर, मारूती सातपुते, छाया पाटील, संगिता ढिकले, योगेश बोराडे, श्रीरंग दिक्षित, अरविंद पवार, वैभव ढोणे, विनय जाधव, सचिन पाटील, प्रदिप आहिरे, प्रविण संधान, योगेश त्र्यंबके, संजय तुरेकर, अ. अ. सय्यद, राजेश आहेर, उदय लोंखडे दिनेश टोपले, मदन वाडेकर, दिनेश राजवाडकर, वसंत उघडे, मिलिंद माळी, बाळासाहेब चौधरी, वसंत कंवर, सागर गांगोडे, विश्वजीत पाटील, माणिक सोनवणे, मुरलीधर वाघ, गोविंद वरते, गोविंद पाटील, वसंत कवंर, अभिमन खैरणार, प्रमोद घरटे, विकास पाटील, सिताराम हगवणे, मधुकर चव्हाणके, राहुल महाजन, बाळू साबळे, सतिश निकम, बाबुराव उपाम आदी सभासद मोठ्या संख्येने सहभागी होते. संस्थेचे सचिव संदीप दराडे यांनी सर्व सहभागी संचालक व सभासद यांचे आभार मानुन राष्ट्रगीताने सभा संपन्न झाली.