इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा आयआयटी खरगपूरच्या कृषी व अन्न अभियांत्रिकी विभागात अभ्यास दौरा : माजी सभापती रघुनाथ तोकडे यांनी केले नेतृत्व

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१

इगतपुरी तालुक्यातील भूमिपुत्र डॉ. चंद्रकांत गेणू दालभगत यांनी फॉर्टीफाईड तांदळावर संशोधन केलेले आहे. त्यांना राष्ट्रीय “गांधीवादी युवा नवोन्मेष २०१९” हा पुरस्कार शासनाने दिला होता. फॉर्टीफाईड तांदूळ निर्मिती प्रक्रियेसाठी प्रायोगिक तत्वावरील निर्मिती युनिट आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्राध्यापक डॉ. हरी निवास मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेले आहे. याव्यतिरिक्त त्याच्या संशोधन प्रयोगशाळेत कुपोषित मुलासाठी High Energy Food Paste तयार करण्याचे तंत्रज्ञान सुद्धा त्यांनी तयार केलेले आहे. शेतकऱ्यांसाठी शेती पूरक अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सल्ला देण्याचे कार्य डॉ. मिश्रा आणि डॉ. दालभगत यांची टीम करत असते. हे तांदूळ निर्मित करणाऱ्या प्लांटला इगतपुरीचे माजी सभापती रघुनाथ तोकडे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी अभ्यास भेट दिली.

इगतपुरी सारख्या तालुक्यातील देवळे ह्या गावातल्या सामान्य शेतकरी कुटुंबातील डॉ. चंद्रकांत गेणू दालभगत यांनी संशोधन केलेला लोहयुक्त तांदुळ देशासाठी मोठे योगदान आहे. डॉ. चंद्रकांत दालभगत यांचे कार्य पाहणी करायला मिळाले. यामधून शेतकऱ्यांना मोठी प्रेरणा मिळाली असल्याचे माजी सभापती रघुनाथ तोकडे यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांच्या पथकाने आयआयटी खरगपूर येथील कृषी संशोधन प्रक्षेत्र परिसरातील विविध फळबागा आंबा, पेरू, लीची, भातशेती, मत्स्य तलाव, वस्तू संग्रहालय, आणि ग्रंथालयात भेट दिली. सर्व शेतकऱ्यांना डॉ. चंद्रकांत दालभगत यांनी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. या शिष्टमंडळात माजी सरपंच सुरेश केकरे, रघुनाथ केकरे, वाळू पाटील ठवळे, तुकाराम  ठवळे, सीताराम जाधव, अशोक तावरे या शेतकऱ्यांचा समावेश होता.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!