मोटारसायकल अपघातात पांढुर्ली येथील २ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेने केली जखमींना मदत

इगतपुरीनामा न्यूज, दि. १०

मुंबई आग्रा महामार्गावरील राजुर गावाजवळ आठवा मैल  परिसरात मोटारसायकल चालकाचे नियंत्रण सुटल्याने आज अपघात झाला. ही घटना दुपारी साडेचार वाजेच्या सुमाराला घडली. MH 15 ET 2882 असा अपघातग्रस्त मोटारसायकलचा क्रमांक असून या घटनेत मोटारसायकल वरील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. मधुकर चिमा सकट वय 62, जयराम यादव सकट वय 50 दोघे राहणार पांढुर्ली ता. सिन्नर अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!