इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
इगतपुरी तालुक्यातील अनेक दुर्गम आदिवासी भागातील गावांना मोबाईल सेवा देणाऱ्या जिओ कंपनीचा टॉवर आज पहाटे वाऱ्याच्या वेगामुळे कोसळला आहे. यामुळे ह्या परिसरातील मोबाईल सेवा एकदमच ठप्प झाली आहे. अन्य मोबाईल कंपन्यांना ह्या परिसरात अजिबात नेटवर्क नाही. यामुळे ऑनलाईन व्यवहार आणि कामांवर दुष्परिणाम झाला आहे. लवकरात लवकर ह्या टॉवरची दुरुस्ती करून आदिवासी भागाला नेटवर्क उपलब्ध करून द्यावे अशी मागणी ह्या भागातून होत आहे.
इगतपुरी तालुक्यातील अनेक दुर्गम आदिवासी भागात यापूर्वीच्या काळात जगाला हाकेच्या अंतरावर आणणाऱ्या मोबाईलला रेंज नव्हती. परिणामी ह्या भागात अन्य कंपन्याच्या जाणाऱ्या येणाऱ्या थोड्याफार नेटवर्कचा वापर व्हायचा. जिओ कंपनीने आदिवासी परिसर असणाऱ्या आंबेवाडी भागात जिओचा टॉवर उभारला. त्यामुळे चांगली मोबाईल सेवा आणि इंटरनेटचा वापर आदिवासी नागरिक करू लागले. मात्र हा टॉवर आज पहाटे अति वाऱ्यामुळे कोसळला. यामुळे ह्या भागातील नेटवर्क बंद आहे. अन्य कोणत्याही मोबाईलला नेटवर्क नाही. ग्रामस्थांना लवकरात लवकर टॉवर दुरुस्ती करण्याची प्रतीक्षा आहे. पावसामुळे टॉवर दुरुस्तीला उशीर लागेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.