निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
समृद्धी महामार्गामुळे काही जणांची समृद्धी तर काहींची उपेक्षाच झाली आहे. कित्येक ठिकाणचे स्थानिक व अंतर्गत रस्त्यांची पूर्णतः चाळण झाली होती. स्थानिक नागरिकांनी काम बंद व ठिय्या केल्यामुळे कित्येक रस्ते पूर्ववत करून दिले आहेत. समृद्धी महामार्ग अनेक ठिकाणी घोटी- सिन्नर मार्गावरून क्रॉसिंग करत असल्याने बहुतांश ठिकाणी उड्डाणपूलाचे कामे सुरू आहेत. घोटी-सिन्नर मार्गावर पिंपळगाव मोर नजीकच समृद्धीचे पुलाचे काम सुरू आहे. मागील वर्षी घोटी-सिन्नर रस्त्यावर सिमेंट काँक्रिटिकरण करण्यात असून ज्या ठिकाणाहून समृद्धी महामार्ग क्रॉसिंग होतो तेथे काँक्रिटिकरण करण्यात आले नव्हते.
काँक्रिटिकरण बाकी असलेल्या ठिकाणी उन्हाळ्यात डांबरीकरण करून नवीन रस्ता तयार केला होता. मान्सूनच्या पहिल्याच पावसात डांबरीकरण केलेल्या ह्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
लहानमोठे अपघात होण्याची शक्यता अटळ
काही दिवसांपूर्वी चांगल्या असलेल्या रस्त्यामुळे वाहने सुसाट धावत आहेत, अचानक समोर खड्डे दिसल्याने वाहनांची शीघ्र गती कमी केल्याने लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही.
बाजूलाच समृद्धी कामाचे खड्डे असल्याने तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची गरज
डांबरी रस्त्यावर पडलेल्या खड्डयांच्या बाजूलाच समृद्धी कामाचे खड्डे आहेत. अवजड व गतीने असलेल्या वाहनाने खड्डे चुकवण्यासाठी साईडपट्टीला वाहन उतरावल्यास मोठा अनर्थ होण्याची घडू शकतो.