आगरी सेना विद्यार्थी परिषद इगतपुरी तालुकाध्यक्षपदी समाधान भागडे यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७

आगरी सेना विद्यार्थी परिषद इगतपुरी तालुकाध्यक्षपदी समाधान भागडे यांची निवड करण्यात आली आहे. आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी यांच्या आदेशानुसार आगरी सेनेचे उपाध्यक्ष गणपत दादा कडु यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी आगरी सेनेचे नेते प्रदिप साळवी, राहुल साळवी, जयेंद्र खुणे, जिल्हाप्रमुख संपत डावखर, इगतपुरी तालुकाध्यक्ष नारायण वळकंदे, आगरी सेना संपर्कप्रमुख सिध्देश्वर आडोळे, युवाध्यक्ष विनोद भागडे,  गणेश कडू आदी पदाधिकारी उपस्थित होते. या नियुक्तीचे जयंत भागडे, संतोष भटाटे, निलेश कडु, मोहन चव्हाण, जय महाराष्ट्र ग्रुप, शिव साई गर्जना ग्रूप आदींनी स्वागत केले आहे. आगरी सेनेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम उभे करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करील असे आश्वासन समाधान भागडे यांनी दिले.

Leave a Reply

error: Content is protected !!